मनात माझ्या मनात तु,
कशीही असलीस तरी माझीच तु.
हृदयात खुलते नाजूक कळी जेव्हा लाजून बघतेस तु,
कशीही असलीस तरी माझीच तू.
मी असा मी तसा रंगात तुझ्या रंगून वेगळा,
मी भुंगा आणि तु फुलपाखरू
कशीही असलीस तरी माझीच तु.
मी स्वप्न वेडा तुझ्या स्वप्नातला राजकुमारा वर भूललीस तु
कशीही असलीस तरी माझीच तु.
कशीही असलीस तरी माझीच तु
No comments:
Post a Comment