Thursday, July 18, 2024

तुला माझी आठवण येते का

मला तुझी खुप आठवण येते 
तुला माझी येते का ?

तू जवळ नसताना तू नसण्याची खंत भासते.

मला तुझी खुप आठवण येते.
तुला माझी येते का ?

रोज उठताना तू जवळ असल्याचा भास होतो,पण डोळे उघडताच एकांत भासतो,
डोळे भरून तुला पाहण्याची खूप इच्छा असते, तू नसतानाही तूच मनात दाटली असते,
ह्या स्वप्नांचा अट्टाहास पूर्ण होईल का ? 
ह्या स्वप्नांची पूर्तता करण्यास तू कधी येशील का ?
मला तुझी खुप आठवण येते 
तुला माझी येते का ?

Monday, July 15, 2024

तुझ्यातला मी आणि माझ्यातली तू

तुझ्यातला मी आणि माझ्यातली तू.

ती.
खूप कठीण असते कधी कधी स्वतःला समजावन त्याच्या मनात असून सुधा त्याच्या ओठावर ते आण.दूर राहून सुधा त्याचाच होऊन राहणं त्याला कळून न देता त्याच्या साठी जगणं,मनातली घालमेल मनातच ठेवण तो समोर असतानाही त्याला मनातले कळून न देणं,त्याची आठवण येताच चेहऱ्यावर स्मिथ हास्य येणं ,त्याला दुरून पाहताच स्वतःला सावरन.

तो.
खूप कठीण असते तिच्या समोर जान तिला कळून न देता तिला एकटक पाहणं,तिला पाहताच बेधुंद होऊन जान तिच्या सोबत असताना जगाला विसरून जान.ती दिसल्यावर प्रफुल्लित होऊन जान तिला कळून न देता तीच होऊन जान,तिच्या दुःखा सुखात तिच्या सोबत राहणं तिला त्रास होताच माझ कळवळून जाण,मन जरी कठोर तरी मेणा सारखं वितळून जाण तिच्या साठी जगत असताना ही तिला कळून न देणं.