Saturday, February 8, 2020

Rose Day

Rose Day.
आज होता रोझ डे वेलेनटाईन डेज चा पहिला दिवस. सर्वच तयारी करत होते आप आपल्या प्रियसी ला रोझ देण्याची. तसा तोही तयारी करत होता तिला रोज देण्याची.तसा तो खूप लाजरा बुजराच होता पण आज त्यांनी ठरवलेच होते तिला जाऊन विचारायचे काहीही झाले तरी. आज त्याला तिचे उत्तर हवे होते.कारण आता लपवाछपवी करणे त्याला जमत नव्हते.आज तब्बल दोन वर्ष तीन महिने सहा दिवस आणि आठ तास झाले होते त्याला तिच्या वर प्रेम करता करता आणि  त्याला आज हे तिला सांगायचे होते.तो खूपच अस्वस्थ आणि गोंधळलेला होता.त्याच्या बोलण्या चालण्या वरून त्याच्या वागण्यावरून हे कळत होते.पण ते लपवायचा तो पुरे पुर प्रयत्नही करत होता.सकाळचे सव्वा आठ झाले होते त्याची तयारी ही झाली होती पांढरा शुभ्र शर्ट आणि काळया रंगाची विजार. असा त्याचा गणवेश होता.एका हातात गुलाबाचे फुल आणि दुसऱ्या हातात कॅडबरी.तो लगबगीने घरातून बाहेर पडला आणि घरा जवळच असलेल्या बस स्टॉप वर तिची वाट पाहू लागला.तिच्या येण्याची वेळ झाली होती तो वेळेवर बस स्टॉप वर पोचला होता. ती अद्याप आली नव्हती त्याची नजर बस स्टॉप वर फिरवत होती तिला शोधत होती.डोक्यातील चक्र चालूच होते.तो एकाच जागेवर चकरा मारत होता. आणि अचानक त्याची नजर तिच्या वर पडली आणि त्याचे हृदयाचे ठोके वाढू लागले.ती बस स्टॉप च्या उजव्या बाजूला असणाऱ्या रस्त्यावरून येत होती आज ती एकटीच होती.रोज तिच्याबरोबर तिची मैत्रीण असायची.पण आज ती त्याला दिसत नव्हती.त्याची नजर तिच्यावर पडली आणि तिच्या कडे पाहतच राहिला.आज तिने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता आणि त्यावर पांढरी ओढणी घेतली होती.ओठावर हलक्या गुलाबी रंगाची लाली आणि माथ्यावर काळया रंगाची छोटीशी टिकली लावली होती.हातात गोल्डन कलरचे घड्याळ आणि खांद्यावर काळया रंगाची बॅग.तिला पाहून तो तीच्यवर भाळून गेला. कारण ती आज खूपच सुंदर दिसत होती.तिला पाहून तो तिच्यात इतका रमला की ती त्याच्या कडे पाहत आहे ह्याचे ही त्याला भान राहिले नाही.तेवढ्यात तिने त्याच्या कडे पाहून डोळे मोठे केले तसे तसा तो भानावर आला आणि इथे तिथे पाहू लागला.हे पाहून ती ही थोडी लाजली आणि इथे तिथे पाहू लागली.तिच्या चेहऱ्यावर आज एक वेगळाच आनंद होता ती हसत होती.लाजत होती.आपल्या केसाच्या लटे बरोबर खेळत होती.तिने त्याला पहिले होते.आणि त्याला पाहून ती आज खूपच आनंदात होती.आज दोन वर्ष ती त्याला रोज पहायची.आणि तो ही तिला पाहतो हे तिला तिच्या मैत्रिणीने सागितले होते.तसे तिने त्याची  सर्व चौकशी करून घेतली होती.की तो त्याच्या घरातील एकुंता एक मुलगा आहे. त्याला एक लहान बहीण आणि आई वडील असे छोटे कुटुभ आहे. दिसाला सुंदर,देखणा,रंग सावळा पण उठीव,पिळदार शरीर आणि मन मोहून टाकणारे बोलणे.त्याच्या मित्रा मध्ये त्याचा चागलाच प्रभाव होता. तेवढ्यात तो पुढे आला आणि तिचे लक्ष त्याच्यावर पडले आणि ती घाबरली.तिने स्वतःला सावरले.आणि बस येणाऱ्या दिशेने पाहू लागली.तसा तो तिच्या जवळ जाऊ लागला त्याच्या ह्रदय्याचे ठोके वाढू लागले .आज काहीही करून तिला विचारायचे असे त्याने ठरवले होते.तो पुढे सरसावला आणि तिच्या पुढ्यात जाऊन उभा राहिला.त्याची नजर इथे तिथे पाहू लागली.त्याने सभवतालची पाहणी केली आणि आपला हात पाठच्या खिश्यात टाकला. आणि खिश्यात ठेवलेले गुलाबाचे फुल त्याने हातात घेतले.त्याच्या हातात गुलाबाचे फुल पाहून ती लाजली आणि उगीच दोन पाऊले त्याच्या पासून विरूद्ध बाजूला सरकली.तो घाबरला आणि पटकन त्याने ते गुलाबाचे फुल परत खिश्यात घातले.हे पाहून तिच्या चेहऱ्यावरील हास्य हरवले आणि ती विचारात पडली.ह्याने विचार बदला की काय असे तिला वाटू लागले.पण आता जर ती काही बोली तर काही गडबड तर होणार नाही ना असा विचार करून ती तिथेच उभी राहीली.तो पर्यंत तो  ही जरा सावरला आणि पुन्हा इथे तिथे पाहून बस स्टॉप वरील हालचालीचा मागोवा घेऊ लागला.प्रत्येक जण आप आपल्या मध्ये गुंतलेले होते त्याच्यावर आणि तिच्यावर कोणाचेच लक्ष नाही हे पाहून तो परत तिच्या कडे सरकला.या वेळी ती तिथेच उभी राहिली.त्याने  तिच्या हाताला स्पर्श केला.तसे ती शहारली. पण तिने ते व्यक्त होऊन दिले नाही.आणि ती त्याच्या कडे वळली.आणि त्याच्या कडे रागाने पाहू लागली.तसा तो तिला बोला माझे नाव सचिन.आपले नाव काय आहे.तशी ती बोली तुम्हाला काय त्याच्याशी.तो गप्प झाला.पण काही वेळ शांत बसून त्याने परत तीला विचारले. मी तुम्हाला रोज पाहतो. तुम्ही ४०९ बस ची वाट पाहत आहात ना.तशी ती त्याच्या कडे वळून पाहू लागली आणि बोली तुम्हाला कसे माहीत.तसा तो बोला मी इथे जवळच राहतो आणि नेहमी तुम्हाला पाहतो.हे ऐकुन तिने खोटा खोटा राग दाखवत रागाने बोली ते कष्या साठी.त्यावर तो बोला तुमचे नाव सुमन ना तुम्ही इथेच डोंगरी पाड्यात राहतात ना.तसे ती त्याच्या कडे आश्चर्याने पाहू लागली.तसा तो सावरून पुढे सरकला आणि खिष्यातले गुलाब काढून तिच्या समोर धरले.आणि बोला.मनातील भावना तुझ्या समोर व्यक्त करत आहे.रागावू नकोस आधी मी काय बोलतो ते शांत पणे ऐकुन घे.आणि तुझा जो काही निर्णय आहे तो मला सांग मला तो मान्य असेल.तशी ती शांत झाली आणि बोली ठीक आहे बोल.तसा तो बोला मी आज दोन वर्ष झाली तुला पाहत आहे तुझ्यावर प्रेम करत आहे मला तु खुप आवडतेस.तुझे बोलणे तुझे लाजने.तुझा समजुदार पणा आणि तू तुझ्या घरासाठी जे  काही करत आहे ते ही.तुझ्या बद्दल सर्व माहिती करूनही तुझ्या वरचे माझे प्रेम हे कमी न होता ते वाढतच गेले.माझे नाव सचिन मी एका प्रायव्हेट कंपनी मध्ये सुपर वायजर आहे.मला तू खूप आवडतेस.सागर किनारी चालताना हात तुझा माझ्या हातात देशील का.जीवनाच्या प्रवासामध्ये साथ तुझी देशील का.सुख दुःख साथ झेलू प्रीत माझी होशील का.असे बोलून त्यांनी गुलाबाचे फुल तिच्या पुढ्यात धरले.तिचा चेहरा लाजिरवाणा झाला डोळ्यात अश्रू दाटून आले.तिने त्याच्या कडे पाहिले शनाचाही विलंब न करता त्याला मिठी मारली.आणि दोघेही त्या मिठीत एकमेकांमध्ये हरवून गेले.

No comments:

Post a Comment